खडकावरही उगवण्याची क्षमता असलेल्या आदिवासींनी आता वैद्यकीय क्षेत्रातही मोठी भरारी घेतलीय.नांदेड जिल्ह्यातील डोंगरदऱ्यातील आदिवासींची वाडी असणाऱ्या बोरवाडीने तब्बल 20 डॉक्टर घडवीत डॉक्टरांचे गाव म्हणून जिल्हयात नावलौकिक मिळविला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही भाकरीचा प्रश्न न सुटलेल्या गावाने उच्च शिक्षण घेत, अनंत अडचणींना सामोरे जात, नवा उच्चांक गाठल्याने इतरांचा बोरवाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला आहे.