हृदयरोगाच्या उपचारासाठी सामाजिक बांधिलकी जपत 'उमेद' ने केली आर्थिक मदत...!
नवेगावबांध अंतर्गत देवलगाव येथील लक्ष्मी गटातील रत्नमाला रामेश्वर नेवारे या गरजू महिलेला हृदयरोगाच्या उपचारासाठी उमेद अंतर्गत सहभागी महिलांनी २५ हजारांची आर्थिक मदत करीत रत्नामालाची उमेद जागविली. तसेच आपल्या परीने थोडी का होईना, मदत करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद गाव पातळीवर गरिबी निर्मूलनासह महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजातील विधवा दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक मदत, गरजूंना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतला जात आहे. उमेद म्हणजे केवळ अभियान नसून जगण्यासाठी सामूहिक प्रयत्नातून जीवनात नवी एक उमेद निर्माण केली जात आहे.
सत्यमेव प्रभाग संघ नवेगावबांध अंतर्गत देवलगाव येथील लक्ष्मी महिला बचत गटातील रत्नमाला रामेश्वर नेवारे ही विधवा आहे. कोरोना काळात पतीचे निधन झाले. कुटुंबाची परिस्थिती बेताचीच आहे. दोन मुलांचे संगोपन करून रत्नमाला कुटुंबाचा गाडा पुढे रेटत होती. मुलांना वडिलांची कमतरता भासू न देता पराकोटीचा संघर्ष करून पोटच्या मुलांना आधार देत होती. संघर्षमय जीवन सुरू असताना एकाएकी एकल महिला असलेल्या रत्नमालावर नियतीने घाला घातला. हृदयविकाराच्या दुर्धर आजाराने तिला ग्रासले. घरची बेताची परिस्थिती, दोन मुलांची जबाबदारी अशावेळी उपचार करण्यासाठी आर्थिक संकट रत्नमालासमोर निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उमेद अभियानातील महिला एकवटल्या. सत्यमेव प्रभाग संघ नवेगावबांध उज्ज्वल प्रभाग संघ माहूरकुडा येथील महिलांनी मदतीचा हात पुढे केला.
दानदात्यांनी यावे पुढे
रत्नामाला नेवारे या महिलेला हृद- यरोगाच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने
उपचार करणे कठीण आहे. करिता समाजातील दानदात्यांनी पुढे येत मदतीचा हात द्यावा, असे सामाजिक कार्यकर्ते विकास मेश्राम यांनी कळविले आहे.
संकट काळात दिला महिलांनी आधार
प्रभाग संघाच्या महिलांनी पंचवीस हजार रुपये जमा केले. ही मदतीची रक्कम जरी थोडीशी असली तरी यात महिलांची संघटन शक्ती आणि मदतीचा भाव, परोपकाराची वृत्ती दडलेली आहे. देवलगाव निवासी पंचायत समितीचे उपस- भापती होमराज पुस्तोडे, सरपंच दीपाली कापगते, तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे, प्रभाग समन्वयक प्रकाश मेश्राम, भीमाबाई शहारे, बुद्धरत्ना नंदागवळी, इंदू पुस्तोडे, रेखा राऊत, श्यामकला औरासे, सुवर्णा डोरलीकर, अरुणा शहारे, राजश्री टेंभुर्णे, आचल शहारे, उषा नाईक, किरण मस्के, चारुलता पुस्तोडे, माला बडोले, पुष्पा कापगते, विजेंद्र राऊत, दिगंबर कुराडे यांच्या उपस्थितीत रत्नमालाला मदतीचा धनादेश देण्यात आला.
खालील खाते क्रमांकावर आर्थिक मदतीसाठी सहकार्य करावे
- नांव -रत्नमाला रामेश्वर नेवारे
- बँकचे नावं -STATE BANK OF INDIA शाखा अर्जूनी मोर
- खाते क्रमांक - ८९४५६४१७९७८
- IFSC - SBIN 0012309