AI आणि CHATGPT माणसांची जागा घेईल हा गैरसमज- नारायण मूर्ती
CHATGPT मुळे माणसांच्या नोकऱ्या जातील किंवा हे अॅप माणसांची जागा घेईल, यावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी माहिती दिली आहे. कोणतेही अॅप माणसाची जागा घेवू शकणार नाही, असे नारायण मुर्ती यांनी सांगितले आहे. CHATGPT हा एक कृत्रिम CHATBOT असून तसेच अनेक कंपन्या आपला स्वत:चा CHATBOT विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुर्ती यांनी सांगितले.;
जगभरातील माणसांच्या नोकऱ्या जाणार का? अशी चिंता सर्वांना सतावू लागली आहे. मात्र तसे काही होणार नाही, असे विधान इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक नारायण मुर्ती यांनी केले आहे. हे तुम्हाला सांगण्याचे कारण म्हणजे AI चॅटबॉटची आणि CHATGPT माणसांची जागा घेईल का? असा प्रश्न जगभरात उपस्थित केला जातोय. याला प्रत्येकजण टेक्नॉलॉजी (Technology) क्षेत्रातले भविष्य समजू लागला आहे. मात्र तसे नसल्याचे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी सांगितले आहे. चॅटबोट नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र हे अॅप नोकऱ्या न खाता त्या नोकऱ्यामध्ये मदत करणारे ठरणार असल्याचे मत इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक नारायण मुर्ती (Narayan Murthy) यांनी व्यक्त केले. AI हे कधीही माणसाची जागा घेवू शकणार नाही, कारण मानव AI ला तसे करु देणार नाही, AI हा माणसांची जागा घेईल हा निव्वळ गैरसमज आहे, असे मला वाटत असल्याचे नारायण मुर्ती यांनी सांगितले.
OPENAI हे माणसाचे असिस्टंट होवू शकते पण त्याची जागा कधीच घेवू शकत नाही, असे मुर्ती यांनी सांगत आपल्या जीवनाला AI हे अॅप अधिक आरामदायी करु शकते, ऐवढेच याचे काम असल्याचे नारायण मुर्ती म्हणाले. तसेच या टेक्नॉलॉजीमुळे ( Technology ) मानवाचे जीवन अधिक आरामदायी झाले आहे. मानवाकडे अशी बुद्धीमत्ता आहे की, जिच्याशी कोणताही संगणक स्पर्धा करु शकत नाही, असे देखील नारायण मुर्ती (Narayan Murthy) यावेळी म्हणाले तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजीचा ( Technology) शोध लावता हे महत्त्वाचे नाही कारण मानवाचे मन हे कायम टेक्नॉलॉजीच्या (Technology) एक पाऊल पुढे असते आणि त्यामुळेच मानव टेक्नॉलॉजीवर राज्य करत आहे. असे मत नारायण मुर्ती (Narayan Murthy) यांनी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन ( AIMA )च्या स्थापनेला ६७ वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात व्यक्त केले. गुगलने OPENAI शी स्पर्धा करण्यासाठी आपले BARD AI लॉन्च केले आहे. CHATGPT ही एक कृत्रिम CHATBOT आहे. अनेक कंपन्यां आपला स्वत:चा chatbot विकसित करत आहेत. त्यामुळे माणसांनी घाबरुन न जाता ही तंत्रज्ञान शिकून घेण्याची गरज आहे.