80000 चा उच्चांक नोंदवल्यानंतर सोन्यामध्ये मागचे अडीच महिने घसरण पाहायला मिळाली. मात्र, सोनं पुन्हा एकदा 80000 रुपयाच्या जवळ पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या अनिश्चिततेमुळे सोनं 85000 च्या पार जाण्याची शक्यता आहे.
आता दुसरी बातमी पाहूया. लाईफ इंश्युरन्स सेगमेंटमध्ये SBI लाईफने आता LIC ला ओव्हरटेक केलं आहे. रेग्युलर प्रीमियममध्ये SBI लाईफने डिसेंबर महिन्यात LIC पेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.
पुढची बातमी आहे रिअल इस्टेट संदर्भातली. एका बाजूला विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर मार्केटमधून पैसे काढून घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये रिअल इस्टेटमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीमध्ये तब्बल 61% वाढ झाली आहे.