कोविडच्या आधी फेब्रुवारी 2020 मध्ये PVR आयनॉक्सच्या शेअरने 2086 रुपयाचा उच्चांक नोंदवला, हाच शेअर आता 1100 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजे, ऑल टाइम हायपासून हा शेअर 50% खाली आला आहे.
या दरम्यान, कंपनीची विक्री 3414 कोटींवरून 5600 कोटींपर्यंत वाढली आहे. कोव्हिडनंतर कंपनीला सलग 5 वर्ष लॉस झाला आहे. कंपनीच्या 74 सिटीजमध्ये 854 स्क्रीन्स आहेत. या कंपनीचं मार्केट कॅप सध्या 10800 कोटी रुपये आहे. येणाऱ्या काळात कंपनी पुन्हा प्रोफीटेबल होईल का, हा शेअर परत ऑल टाइम हाय क्रॉस करेल का, याबद्दल तुमचं प्रेडिक्शन काय आहे, ते आम्हाला कमेंट करून सांगा.