भारतीय रुपया सोमवारी सकाळी सुरुवातीला २३ पैशांनी घसरून ८६.२७ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. हा मोठा घट १४ पैशांच्या घसरणीनंतर झाला, ज्यामुळे रुपया पहिल्यांदाच महत्त्वपूर्ण ८६.००-मार्क ओलांडला. मागील सहा महिन्यात दररोज रुपयात घसरण होऊन तो ८३ वरून ८६ पर्यंत गेला आहे. रूपयाचे नियंत्रण राखण्यासाठी RBI ने लाखो डॅालर खर्च केले तरीही सरकार आणि RBI या बाबतीत अपयशी ठरले आहेत. हे आर्थिक अरिष्टाचे गंभीर संकेत आहेत.पाहा या विषयावर अर्थतज्ञ विश्वास उटगी यांचे विश्लेषण...