27 सप्टेंबरला 26277 चा उचांक नोंदवल्यानंतर निफ्टीमध्ये घसरण चालू झाली, ही घसरण काही केलं तरी थांबायचं नाव घेत नाहीये. उच्चांकापासून निफ्टीमध्ये 12% तर निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 14 टक्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.
फॉरेन इन्वेस्टर्सकडून होणारी विक्री, मागच्या 1 वर्षात शेअर्सचं वाढलेलं व्हॅल्युएशन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी झालेली निवड, या 3 कारणांमुळे शेअर मार्केटमध्ये घसरण चालू आहे.
डोनाल्ड ट्रम्प कोणतेतरी धाडसी निर्णय घेतील आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. गुंतवणूकदारांनी स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून या घसरणीचा फायदा घ्यावा, असा आमचा सल्ला आहे.