Mahakumbh 2025: अभिमानास्पद ! पुण्याची कंपनी पोहोचवणार महाकुंभ मेळ्याचा प्रसाद
12 वर्षातून एकदा होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी लाखो भक्त जगाच्या कानाकोपऱ्यातून UP च्या प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुमच्या आमच्या सारखे असंख्य भक्त आहेत, ज्यांना हा कुंभ मेळा पाहायचा आहे. पण आपल्या नोकरी व्यवसायामुळे ते शक्य नाहीये. अश्या करोडो भक्तांना घर बसल्या किमान महाकुंभ मेळ्याचा प्रसाद मिळावा म्हणून, वायू या फूड डिलिव्हरी अँपने ONDC बरोबर करार केला आहे.
साधारण 1.5 कोटी ऑर्डर्सच्या माध्यमातून शुद्ध तुपातले बेसनाचे लाडू आपल्या पर्यंत पोहोचवण्याचं काम वायू हे फूड डिलिव्हरी अँप करणार आहे. या उपक्रमामुळे फूड डिलिव्हरी सेगमेंटमधील वायूचं स्थान अधिक मजबूत होईल.