पराग पारीख म्युच्युअल फंडने डिसेंबर महिन्यात सिप्ला, कोटक महिंद्रा बँक आणि ऍक्सिस बँक या 3 शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा आणि नारायणा हृदालय या 2 शेअर्समध्ये फ्रेश एंट्री केली आहे. याचा अर्थ PPFAS AMC सध्या बँकिंग आणि फार्मा अँड हेल्थकेअर सेक्टरवर बुलिश आहे, असं म्हणता येईल.
दुसऱ्या बाजूला त्यांनी मोतीलाल ओसवाल, MCX आणि CDSL सारख्या कंपन्यांमध्ये होल्डिंग कमी केलं आहे. त्यांच्या फंड्समध्ये सर्वाधिक एलोकेशन HDFC बँकेमध्ये आहे. पराग पारीख यांनी खरेदी केलेल्या शेअर्सपैकी कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक रिटर्न मिळेल, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला कमेंट करून कळवा.