शेअर मार्केटमध्ये नुकसान का होतं?
एखाद्या स्टुडंटने जर बारावीनंतर डायरेक्ट PHD करायचं ठरवलं तर तो पास होईल का, आता तुम्ही म्हणाल हा काय फालतू प्रश्न विचारताय, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन न करता थेट PHD करायला गेलो तर आपण 100% फेल होणार. आता विचार करा कि आपण डिमॅट अकॉउंट उघडल्यावर डायरेक्ट फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेड करायला लागलो तर काय होईल, 100% अपयश मिळणार. म्हणूनच 90 टक्यापेक्षा जास्त ट्रेडर्स मार्केटमध्ये लॉस करतात.
मार्केटमध्ये एंट्री केल्यावर सुरुवातीचे 2 वर्ष F & O सेगमेंटमधील शेअर्समध्ये लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, त्यांचे फंडामेंटल्स स्टडी करा. मग पुढचे 2 ते 3 वर्ष याच शेअर्समध्ये पोजीशनल किंवा स्विंग ट्रेडिंग करा, 4 - 5 वर्षाचा एक्सपीरिअन्स मिळाला कि मग फ्युचर्स ऑप्शन्स निफ्टी बॅंकनिफ्टीमध्ये ट्रेड करून बघा. तुम्हाला कधीच नुकसान होणार नाही.