मोहित कंबोज यांच्या आरोपावर संजय राऊत यांची चुप्पी?
शिवसेना भवन येथून पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मोहित कुंबोज यांच्यावर आरोप केले होते. त्याला मोहित कुंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर आरोप केले. त्यावरुन मोहित कुंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्या आरोपावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे मोहित कुंबोज यांच्यावर आरोप केले होते. त्यावरून आज सकाळी मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर पत्रकार परिषद घेतली. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ED च्या अधिकाऱ्यांवर तसंच भाजप नेत्यांवर आरोप केले होते. तसंच पंतप्रधान कार्यालयाला पुरावे दिल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. त्या आरोपांना मोहित कुंबोज यांनी प्रत्युत्तर दिले.
मोहित कुंबोज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी. अन्यथा आम्ही या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
शिवसेना भवनमध्ये बसून संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती. तिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सहमती दिली होती. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी सलिम जावेद यांची स्टोरी रचून सांगितली. संजय राऊत व्हिक्टीम कार्ड खेळत आहेत. तसंच संजय राऊत यांनी केलेले आरोप घाबरून केलेले आहेत. राऊत यांनी नवलानी आणि इडीचे संबंध रचवून सांगितल्याचे आरोप कंबोज यांनी केले आहेत.
मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपावर आम्ही दिल्ली येथे संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारला असता राऊत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.