Manik Kokate : कृषीमंत्री माणिक कोकाटेंना तुरुंगवासाची शिक्षा, मंत्रीपदासह आमदारकी धोक्यात ?
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं सुनावली शिक्षा मुख्यमंत्री कोट्यातील घराचं प्रकरण कोकाटेंच्या राजकीय अडचणी वाढणार ? 28 वर्षानंतर खटल्याचा निकाल लागला कोकाटेंच्या भावालाही सुनावली शिक्षा;
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं सुनावली शिक्षा
मुख्यमंत्री कोट्यातील घराचं प्रकरण
कोकाटेंच्या राजकीय अडचणी वाढणार ?
28 वर्षानंतर खटल्याचा निकाल लागला
कोकाटेंच्या भावालाही सुनावली शिक्षा
निकालाविरोधात अपील करणार - माणिक कोकाटे
नाशिक - मुख्यमंत्री कोट्यातील घरं घेण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिक कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोषी ठरविण्यात आलंय. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय. या दोघांनाही दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंडही न्यायालयानं ठोठावलाय.
माजी मंत्री तथा तत्कालीन काँग्रेसचे सिन्नर तालुक्यातील नेते तुकाराम दिघोळ यांनी 1995 मध्ये युएलसी (नागरी जमीन कमाल धारणा) विभागात एक तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये माणिक कोकाटे आणि त्यांच्या भावाने मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका घेतांना खोटी कागदपत्रं आणि माहिती लपविल्याचा आरोप तक्रारदार दिघोळ यांनी केला होता. दिघोळ यांच्या तक्रारीवरुन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली. चौकशीअंती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोकाटे बंधुंविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 1997 मध्ये पोलिसांनी नाशिक जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
याप्रकरणी मागील 28 वर्षांपासून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होती. आज (20 फेब्रुवारी) रोजी न्यायालयानं याबाबतचा शिक्षा सुनावली. त्यात कृषीमंत्री माणिक कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय.
"केसचा निकाल ३० वर्षानंतर आज पहिल्यांदा लागला आहे. मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे. निकालपत्र हे मोठं आहे, ४० पानांचं आहे, ते मी अजून वाचलेलं नाही. मी अपील करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे" - माणिक कोकाटे, कृषीमंत्री