शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपुर्ती झाली. पण या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकारने धोरणात्मकदृष्ट्या नेमकं काय केलं? सरकारचं धोरणात्मक यश काय? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी विश्लेषण केले आहे.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकारचा लेखाजोखा काय आहे? याचा विचार करत असताना सुहास पळशीकर यांनी काही वेबसाईट चाळल्या. काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली. मात्र धोरणात्मकदृष्ट्या सरकारने विशेष काही केल्याचे दिसत नाही.
मात्र सरकार मित्रचा गवगवा करत आहे. मित्र म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची स्थापना केली. मात्र मित्र सुरु करण्यासाठी निती आयोगानेच सगळ्या राज्यांना निर्देश दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने स्थापन केलेली संस्था म्हणजे धोरणात्मक निर्णय नाही.