आज खासदार संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. सध्या राज्यातील सामाजिक वातावरण आरक्षणावरुन तापलेलं असताना ही बैठक पार पडली आहे. कालच 16 जूनला संभाजी राजे यांनी कोल्हापूर येथे मूक आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होती.
खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर काही मागण्या महाराष्ट्र सरकारकडे केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, कोल्हापूर येथे झालेल्या कालच्या मूक आंदोलनानंतर आज मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण उपस्थित होते.
या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी बैठकीत घडलेल्या चर्चेसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. पाहा काय म्हणाले अशोक चव्हाण...