पंतप्रधानांचे गुलाम निवडणूक आयुक्त - उध्दव ठाकरे

Update: 2023-02-18 10:26 GMT

“आज महाशिवरात्र आहे, मात्र आपलं शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहोत. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू. मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या मी मशाल घेऊन येतो, मग बघू जनता कुणाला निवडणार” असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटाला दिलं आहे.

Full View

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिल्यानंतर उध्दव ठाकरे आक्रमक झाले आहे. काल संध्याकाळी हा निर्णय झाला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का असताना सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच पक्षाचं नाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये. ज्यांनी आधी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पाहते आहे मात्र चोर तो चोरच असतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

त्यानंतर आज मातोश्रीबाहेर उभं राहूनही त्यांनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे.

“आज महाशिवरात्र आहे, मात्र आपलं शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहोत. आपण सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू. मी या चोरांना आव्हान देतो आहे की, तुम्ही जो धनुष्यबाण चोरला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू जनता कुणाला निवडणार” असं खुलं आव्हानच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटाला दिलं आहे.

Tags:    

Similar News