वाडा भिवंडी महामार्गातील खड्ड्यात पडून बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
भिवंडी वाडा महामार्गाच्या दुरावस्थेचा आणखी एक बळी गेला आहे...
भिवंडी वाडा महामार्गाच्या दुरावस्थेचा आणखी एक बळी गेला आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास पालखणे स्टॉप जवळ पडलेल्या खड्ड्यात दोन मोटासायकलस्वारांना गंभीर दुखापत झाली होती, त्यात आकाश जयराम जाधव, वय वर्ष २२ या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
बी.ओ. टी.तत्वावर तयार केलेल्या या रस्त्यावर असलेला टोल नाका बंद झाल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्यात येतात.
खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याने वारंवार अपघात होतात. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या हलगर्जी पणामुळे आकाश जाधव या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याची सखोल चौकशी करून मयत आकाश जाधव याच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.