Dileep Mhaske : आंबेडकरी कार्यकर्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात

आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्याला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याचं विशेष अतिथी म्हणून मिळालेलं निमंत्रण ऐतिहासिक असल्याची भावना म्हस्के यांनी व्यक्त केली.;

Update: 2025-03-03 12:42 GMT


अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंतांनी सहभाग घेतला होता. त्यात काही मोजक्याच भारतीयांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. आंबेडकरी विचारांचे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप म्हस्के यांनाही या सोहळ्यात निमंत्रित करण्यात आलं होतं... यावेळी जागतिक स्तरावरील विविध नामवंतांसोबत सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक विषयावरही म्हस्के यांनी संवाद साधला. आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्याला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याचं विशेष अतिथी म्हणून मिळालेलं निमंत्रण ऐतिहासिक असल्याची भावना म्हस्के यांनी व्यक्त केली.

दिलीप म्हस्के हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून म्हस्के हे समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांनी 1995 साली Foundation For Human Horizon ची स्थापना केली, जी आज संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करते. या समारंभात म्हस्के यांनी जागतिक नेत्यांना आपल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात जगातील काही सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती उपस्थित होत्या. म्हस्के यांनी या नेत्यांसोबत व्यक्तिगत संवाद साधला आणि जागतिक विकासासाठी त्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

1. जेफ बेजोस : म्हस्के यांनी बेजोस यांच्यासोबत चर्चा करून, ई-कॉमर्सद्वारे ग्रामीण विकासाला चालना देण्याबाबत आपले विचार मांडले. भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी Amazon सारख्या कंपन्यांच्या सहकार्याची आवश्यकता म्हस्के यांनी अधोरेखित केली.

2. मार्क झुकेरबर्ग : Meta च्या आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कसा करता येईल, यावर म्हस्के आणि झुकेरबर्ग मध्ये चर्चा झाली. झुकेरबर्ग यांनी म्हस्के यांच्या अफ्रिका प्रकल्पाचं कौतुक केलं.

3. इलॉन मस्क : मस्क यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये म्हस्के यांनी भारतात स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी Tesla च्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत चर्चा केली. दोघांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ ऊर्जेच्या भविष्यातील संधीबद्दलही विचारविनिमय केला.

4. सर्गे ब्रिन : सर्गे ब्रिन यांच्यासोबत म्हस्के यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी भारतातील शिक्षण क्षेत्रातील नवकल्पनांवरही चर्चा केली.

आंतरराष्ट्रीय उद्योगपती आणि नेत्यांसोबत सहभाग

■ मुकेश अंबानी ($98.1 अब्ज)

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबतही दिलीप म्हस्के यांनी भारतातील औद्योगिक विकास आणि सामाजिक बदल यावर चर्चा केली.

Tags:    

Similar News