काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यास प्रेरणादायक अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेटी
वर्धा जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने आज जिल्ह्यातील स्वातंत्र्यास प्रेरणादायी असलेल्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. . ‘व्यर्थ न जाये ये बलिदान’ मोहिमे अंतर्गत या भेटी देण्यात आल्या;
वर्धा : वर्धा जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने आज जिल्ह्यातील स्वातंत्र्यास प्रेरणादायी असलेल्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. स्वातंत्र्यसाठी देशव्यापी चळवळ उभी केली ती "काँग्रेसने" स्वातंत्र्य भारताच्या विकासात काँग्रेसची भूमिका किती महत्त्वाची होती आणि आहे यांचे महत्व सांगण्यात आले. 'व्यर्थ न जाये ये बलिदान' मोहिमे अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्ह्यातील स्वातंत्र्यास प्रेरणादायी असलेल्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या.
यामध्ये दुपारी ३.३० वाजता लक्ष्मी- नारायण मंदिर, दुर्गा टॉकीज येथे एकत्रित होऊन प्रार्थना करून चर्चा करण्यात आली. तेथून विनोबा भावे आश्रम, पवणार येथे भेट देऊन त्यांच्या जीवनावर आधारित विषयावर चर्चा करण्यात आली,तसेच समाधीला भेट देऊन अभिवादन करण्यात आले.
त्यांनतर महात्मा गांधी आश्रम, सेवाग्राम येथे बापू कुटीला भेट देऊन प्रार्थना स्थळी एकत्र येऊन प्रार्थना करण्यात आली,सोबतच स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पांडुरंग बळीरामजी गोसावी यांचा यथोचित सन्मान करून मोहिमेचा समारोप करण्यात आला.