राणे कुटुंबाला बेछूट आरोप करण्याची सवय आहे, पण त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही, अशी टीका युवासेनेचे सचिव वरुण देसाई यांनी केली आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी युवासेनेचे सचिव वरुण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना वरुण देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. या पत्रकार परिषदेमध्ये परिवहन मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते. वरुण देसाई यांचे सचिन वाझेंशी आर्थिक संबंध होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंचे सर्व आरोप वरुण देसाई यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच नितेश राणेंनी आरोपांचे पुरावे द्यावे असे आव्हानही वरुण देसाई यांनी दिले आहे.