''उर्फि चित्रा वाघ यांना राजकीय संन्यास..'' उर्फी व चित्रा वाघ वादावर लोकांना काय वाटतं?

Update: 2023-01-10 06:43 GMT

 अनेक दिवस आपण समाजमाध्यमांवर तसेच मुख्य माध्यमांमध्ये सुद्धा पाहतो आहोत ती चर्चा म्हणजे उर्फी जावेद आणि चित्र वाघ यांच्यातील रंगलेला जोरदार वाद. या वादाने आत्तापर्यंत अनेक वळणे घेतली. ट्विटर वॉर पासून सुरु झालेला हा वाद थेट महिला आयोगापर्यंत गेला. मागच्या काही दिवसात पाहिलं तर उर्फी तिच्या सोशलमिडीया अकॉउंट वर वारंवार चित्रा वाघ यांना डिवचताना पाहायला मिळतीये. आता उर्फीने थेट चित्रा वाघ याना सासू म्हंटल आहे एवढाच नाही तर ''Uorfi ki underwear me chhed hai , Chitra tai great hai'' इतपर्यंत हा वाद पोहोचला आहे. उर्फी चित्रा वाघ यांच्या चांगलीच हात धुऊन मागे लागली आहे. आता या सगळ्या सोशल वॉर वर लोकांच्या काय प्रतिकिया आहेत जाणून घेऊया. 

तर मागचे अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात उर्फी जावेद या तरुणीची जोरदार चर्चा आहे. मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या हटके कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीच्या सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट आहेत, तोतडे कपडे खालून उर्फी वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे शूट करत असते. याच तिच्या हटके स्टाइलमुळे तिच्यावर वारंवार टीकेची झोड उडत असते.. एकीकडे आपण जर तिच्यावर होणारी टीका पहिली आणि दुसरीकडे तिला मिळणारे व्हव्ज पहिले तर तिचे फॅनफॉलोअर्स अफाट आहेत. मिलियन मध्ये तिचे फॅनफॉलोअर्स आहेत. आता याच उर्फीला चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केली आणि तिथून हा वाद चालू झाला.. आता तर उर्फीने चित्रा वाघ याना चक्क सासू म्हंटले आहे.. काल तिने दोन ट्विट केले आहेत या दोन ट्विटच्या माध्यमातून तिने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.. काय आहेत हे ट्विट तर पहिल्या ट्विट मध्ये ती म्हणते की, ''Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu...'' एवढ्यावर ती थांबलेली नाही त्यानंतर तीच आणखीन एक ट्विट केलं त्यात ती म्हणते, Uorfi ki underwear me chhed hai , Chitra tai great hai ❤️❤️ आता या दोन ट्विट नंतर हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत... उर्फी जावेद काही केल्या चित्र वाघ यांना डिवचण्याची एक संधी सोडत नाही आहे..

बरं या सगळ्या वादावर सर्वसामान्य लोकांना काय वाटतं. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात जे ट्विटर वॉर सुरु आहे त्यावर लोकांच्या काय प्रतिकिया आहेत पाहुयात... उर्फी ज्या प्रकारे चित्रा वाघ्यांच्यावर लाइन रचत आहे त्याच प्रकारे कॉमेंट बॉक्स मध्ये लोकांच्या प्रतिकिया दिसत आहेत.. , Uorfi ki underwear me chhed hai , Chitra tai great hai ❤️❤️ या ट्विट वर दीपाली धुरी म्हणतात की, मला तर हसून हसून पोटात गोळा आला. ही काय करते ते मस्त करते आहे. विचीत्रा वाघ नको तिकडे किडे करते..

तर याच ट्विट वर प्रकाश वानखेडे म्हणतात की, उर्फीने दिवसा दाखवले चित्राला तारे आजपासून उर्फीचं आडनाव वाघमारे....

योगेश पुरोहित यांनी तर कुणीतरी पत्रक काढत हा वाद थांबवण्याची विनंती केली आहे ते म्हणतात, कोणीतरी पत्रक काढून हा वाद थांबवायला मदत करा रे.... सासूची वाट लागलेली बघवत नाही..... 🙏🙏😔😔😉

तर ठाकूर प्रणव सिँह म्हणतात की, जे गुलाम लाळ चाटे हीचा काही दिवसापूर्वी विरोध करायचे आज चक्क तिचा समर्थन करतायत 🤣🤣🤣

संभा नावाचे ट्विटर वापरकर्त्ते म्हणतात की, उर्फि चित्रा वाघला राजकीय संन्यास घेयला भाग पाडणार..

आता या झाल्या उर्फी जावेद यांच्या ट्विट वर आलेल्या लोकांच्या प्रतिकिया चित्रा वाघ यांच्या ट्विटर वर जर आपण गेलो आणि पाहिलं तर त्यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट करून या वादावरून महिला आयोगाला खडे बोल सुनावले होते.. त्या ट्विटवर लोक काय म्हणतात पाहुयात, इंद्रजित पाताबाकर म्हणतात की, तुमचा लढा एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत चालू राहतो. ज्याच्या विरुद्ध लढा चालू असतो त्याने भाजप प्रवेश केल्यावर तो लढा संपतो.

फरिश्ता हे ट्विटर वापरकर्ते म्हणतायत की, चित्राताई तुम्ही अशा गंभीर प्रश्नांवरती आवाज उठवला त्यासाठी धन्यवाद, परंतु संजय यांच्या वरती तुम्ही बोलणे का बंद केले आहे हे देखील सर्व लोकांना कळलं पाहिजे, फक्त शिंदे गट आणि बीजेपी ची युती झाल्यामुळे त्यांनी केलेल्या प्रत्येक कामावरती पडदा टाकणार आहात..

दीपक कागणे म्हणतायत की, महाराष्ट्र राज्य मधील राजकारणाचा स्तर घसरत जात आहे.. सगळेच वाचाळ झालेत कोणी कमी नाही जनतेलाच लाज वाटत आहे एक विधायक काम नाही करणार पण रोज प्रसिध्दी कशी मिळेल यात स्पर्धा लागली आहे चालू द्या..

तर एकंदरीत उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या या वादावर सर्वसामान्य लोक आशा प्रकारे व्यक्त होत आहे.. तुम्हाला काय वाटतं दीपिका पदुकोण, उर्फी जावेद यांचा राजकारणासाठी वापर केला जातो आहे का..? राज्यात इतके महत्वाचे प्रश्न असताना हा वाद महत्वाचा आहे का? हा वाद प्रसिद्दीसाठी चालू आहे का? तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा...

Tags:    

Similar News