बारामतीचे आलताफ शेख बनले IPS अधिकारी
बारामतीचे आलताफ शेख बनले IPS अधिकारी UPSC result Altaf sheikh from Baramati become IPS officer;
आज यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेत बारामतीच्या अल्ताफ शेख यांनी घवघवीत यश मिळवले आहे. बारामती तालुक्यातील ते पहिलेच आयपीएस अधिकारी झाले आहेत. शाळेत असताना त्यांनी शाळेत असताना भजी आणि चहा विकण्याचं काम केलं होतं.
बारामतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी करिअर अँकॅडमी सुरु करण्यात आली आहे. या अँकॅडमीत शिक्षण आलताफ शेख आज आयपीएस झाले आहेत. अल्ताफ शेख आयपीएस झाल्याची बातमी आल्यानंतर काटेवाडी व राष्ट्रवादी करिअर अँकॅडमीत आनंद व्यक्त केला जात आहे.
अल्ताफ शेख यांनी इस्लामपूर येथे नवोदय विद्यालयात शिक्षण पूर्ण केलं. त्यांच शिक्षण बी. टेक. पर्यंत झालं आहे. ते सध्या इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांना मदत करण्याच्या उद्देशाने सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून 2012 मध्ये राष्ट्रवादी करिअर अँकॅडमीची स्थापना केली होती. आजपर्यंत 47 राजपत्रित अधिकारी या अकादमीतून पास झाले आहेत.
दरम्यान, अंतिम परीक्षेत एकूण ७६१ उमेदवार पास झाले आहेत. ही परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० ला घेण्यात आली होती. परीक्षेसाठी १० लाख ४० हजार, ६० विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरम्यान, जानेवारी, 2021 मध्ये झालेल्या लेखी (मुख्य) परीक्षेत एकूण 10564 विद्यार्थी पास झाले होते, तर व्यक्तीमत्व विकास चाचणीसाठी (Personality Test) साठी एकूण 2053 विद्यार्थी बोलावण्यात आले होते. त्यातील एकूण 761 विद्यार्थ्यांना (545 पुरुष आणि 216 महिला) आयोगाने विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आमंत्रित केलं आहे. यामध्ये, शुभम कुमार रोल नंबर 1519294 याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.