उबाठा गटाचे दोन नेते अडचणीत ; वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

Update: 2023-08-05 09:20 GMT

मुंबई - उबाठा गटासाठी आजचा दिवस हा धक्कादायक बनला आहे. एकाच दिवसात दोन नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हि माहिती समोर येताच उबाठा गटाच्या महत्त्वाचे नेत्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. उबाठा गटाच्या नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. सध्या वायकर हे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरू आहे. उबाठा गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.

रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. मात्र, या चौकशीमुळे वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:    

Similar News