कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर वाहतूक शाखेने फिरवला रोलर

ध्वनी प्रदुषण करणाऱ्या २९ बुलेट धारक यांचेवर मोटर वाहन कायदयान्वये कारवाई करुन त्यांचे मॉडीफाईड कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर धुळे शहर वाहतुक शाखेने रोड रोलर फिरवला.;

Update: 2021-08-20 12:47 GMT

धुळे शहरातील बुलेट मोटरसायकला कंपनीने दिलेले सायलेन्सर ऐवजी मॉडीफाईड कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवुन शहरात ध्वनी प्रदुषण करणाऱ्या २९ बुलेट धारक यांचेवर मोटर वाहन कायदयान्वये कारवाई करुन त्यांचे मॉडीफाईड कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर धुळे शहर वाहतुक शाखेने रोड रोलर फिरून अनोखी कारवाई केली आहे.

धुळे शहर वाहतूक शाखेकडे कर्कश आवाजात शहरात गाड्या फिरून सामान्य नागरिकांना हैराण करण्याची तक्रार प्राप्त झाली होती, त्या संदर्भात वाहतूक शाखेने कारवाई करत कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवत बुलेट धारकांना चांगलाच दणका दिला.

यापुढे देखील फॅन्सी नंबरप्लेट आणि कर्कश हॉर्न आणि सायलेन्सरवर अशीच कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस अधिकारी संगीता राऊत यांनी दिली. दरम्यान वाहतूक शाखेने केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांना स्वागत करत पोलिसांचे आभार मानले आहे.

Tags:    

Similar News