मृत व्यक्तीच्या नावाने रेमडेसिव्हर घेऊन इंजेक्शन्सचा काळा बाजार...

Update: 2021-06-13 12:54 GMT

कोरोनाने देशभरात हाहाकार माजला असताना औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशात अनेकांचे कुटुंबीय हे आपल्या घरातील व्यक्तीला वाचवण्यासाठी जास्त पैसे देत औषधं खरेदी करत होते. या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या देखील छापून आल्या आहेत. तरीही औषधांचा काळाबाजार काही थांबला नसल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटे दरम्यान दवाखान्यांनी रुग्णांची चांगलीच लूट केली आहे. आता तर मेलेल्या रुग्णांना औषधं दिल्याचं देखील समोर आलं आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेशमधील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचं दिसून आलं अक्षरश: नदीमध्ये मृतदेह फेकून देण्यात आले होते.

कानपूरमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय हेलट मध्ये रुग्णांच्या निधनानंतरही त्यांना रेमडेसिव्हीर इजेक्शन दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खरं तर, हेलटच्या रुग्णालयातून गेले कित्येक दिवस नर्सिंग स्टाफ मृत व्यक्तींच्या नावाखाली स्टोरमधून रेमडेसिव्हर इंजेक्शन काढत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरुन ही इंजेक्शनस घेतली गेली आहेत. मृत व्यक्तीच्या नावाखाली घेतलेले इंजेक्शनस हे बाहेर जास्त किंमत आकारून विकले जात असल्याची शक्यता आहे.

सरकारी रुग्णालयात असलेले इंजेक्शनस हे डॉक्टरांच्या परवानगीशिवाय स्टोरेमधून घेता येत नाही. दरम्यान ३० एप्रिल रोजी क्राईम ब्रांचने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना रेमडेसिव्हर इंजेक्शन्सचा काळाबाजार करताना रंगे हात पकडलं होतं.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, हेलट रुग्णालयाच्या वार्ड बॉयचे या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर न्यूरो विभागाच्या नोंदी चाळल्या. तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. "नर्सिंग स्टाफ आणि वॉर्ड बॉय यांनी डॉक्टरांची सही असलेल्या प्रिस्क्रिप्शनद्वारे मृत व्यक्तींच्या नावाखाली रेमडेसीव्हर घेतल्याचं समोर आलं.''

हेलट येथील न्यूरो सायन्सेसमधील एका कर्मचार्‍याने सांगितले की, जर हेलट मधील सर्व कोव्हीड वॉर्ड तपासले तर असे कित्येक कर्मचारी सापडतील जे असा काळाबाजार करत आहेत.

हेलटच्या न्यूरो सायन्स लेव्हल 3 चं रुग्णालय बनवण्यात आलं आहे. इथे दाखल झालेल्या रूग्णांसाठी डॉक्टर दररोज स्टोअरमध्ये औषधांच्या प्रिस्क्रिप्शन पाठवतात. आणि त्यांनतर नर्सिंग स्टाफ किंवा वॉर्ड बॉय औषध घेऊन येतात. प्रिस्क्रिप्शनमध्ये रुग्णाचे नाव, तारीख, आयपी क्रमांक तसेच डॉक्टरांची स्वाक्षरी असते. एकंदरीत रुग्णांच्या मृत्यूनंतरही नर्सिंग कर्मचार्‍यांनी स्टोअरमधून रेमडेसीवर इंजेक्शन घेतल्याचं नोंदणीतून समोर आलं आहे.

Tags:    

Similar News