दहीहंडी उत्सव कोरोनाच्या सावटाखाली; कुंभारांच्या अडचणीत वाढ

Update: 2021-08-25 13:30 GMT

मुंबई  : कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर सरकारने राज्यभरात निर्बंध काही प्रमाणात शिथील केले, मात्र सणांवर निर्बंध आजही कायम आहेत. दहीहंडी उत्सव देखील यंदा कोरोनाच्या सावटाखाली आहे. सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे. याचा फटका आता कुंभार समाजाला देखील बसला आहे.

दहीहंडीला परवानगी नाकारल्याने दहीहंडीसाठी मडकी तयार करणाऱ्या कुंभार व्यावसायिकांच्या हंडीला यंदा फारच कमी प्रमाणात मागणी आहे. दही हंडीच्या पार्श्वभूमीवर कुंभार समाज दिवस-रात्र मेहनत करून मातीची मडकी बनवतात. तयार केलेल्या हंडीवर विविध रंग लावून ती सजवतात, यासाठी यंदा कुंभारांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे, कोरोनाची लाट काहीशी कमी झाल्याने यंदा तरी दही हंडीला परवानगी मिळेल अशी आशा या व्यवसायायिकांना होती.

त्यामुळे त्यांनी मोठी गुंतवणूक केली, मोठ्या प्रमाणात मडकी बनवली मात्र, दहीहंडी उत्सवाला परवानगी नारकल्याने या मडक्याचे करायचे काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. आतातरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे कहाणी निर्बंध घालून का होईना दहीहंडीला परवानगी द्यावी जेणेकरून गोरगरीब कुंभारांवर उपासमारीची वेळ येणार नाही असं कुंभार व्यावसायिकांनी म्हटले आहे सोबतच मायबाप सरकारने हातावर पोट असलेल्या कुंभार समाजाला काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी कुंभार वर्गाकडून होत आहे.

Tags:    

Similar News