कालबाह्य झालेली गुरुकुल शिक्षण पद्धत आजही धुळ्यात सुरू

Update: 2021-07-23 05:15 GMT

भारतात गुरुपौर्णिमाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी होते. मात्र, यंदा आज (23 जुलै)रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. व्यास ऋषींचे स्मरण करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. या दिवशी आपल्या गुरुंचा आदर आणि त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यात येते.

पुर्वी गुरूकुल शिक्षण पध्दती होती. त्यावेळी गुरू – गुरूकुल शिक्षण पध्दतीला विशेष महत्व होते. कालंतराने शिक्षणाच्या क्षेत्रात कालबाह्य झालेली गुरुकुल शिक्षण पद्धत आजही धुळे जिल्ह्यामध्ये 14 वर्षापासून सुरू आहे. विद्यार्थ्यांना फी नाही, आणि शिक्षकांना पगार नाही या तत्वावर श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा व संस्कार केंद्राच्या माध्यमातून गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना आजही शिक्षण दिलं जातं आहे.



एकीकडे शिक्षणक्षेत्रात होत गेलेले अमुलाग्र बदल आणि त्यातून विद्यार्थी आणि पालकांची होणारी लूट आपण नेहमीच पाहतो. मात्र धुळे जिल्ह्यात गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा व संस्कार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षण देण्याचे काम गेल्या चौदा वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.

ह.भ.प. गीता मूर्ती सुदर्शन महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था वडिभोकर गाव आणि गोंदूर या दोन गावांच्या मधोमध म्हणजे गोंदूर विमानतळ रस्त्यावर ही संस्था सुरू आहे.

या संस्थेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील जवळपास 55 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, वारकरी संप्रदायाचे तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमाचे धडे विद्यार्थी घेतात. पहाटेपासून योगासने, प्राणायाम झाल्यानंतर विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात दिवसभरात विद्यार्थी आपली स्वत:ची कामे स्वतः करतात या संस्थेला विविध सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील लोकांकडून सातत्याने मदतीचा ओघ सुरू असतो.

राष्ट्रकार्यासाठी भविष्यात तयार होऊ – देवरे

"मी ज्या संस्थेत शिकलो त्याच संस्थेसाठी आज काम करीत आहे. शिक्षकांनी दिलेला उपदेश भविष्य घडविण्यासाठी उपयोगी पडला आणि त्यातूनच राष्ट्रकार्यासाठी भविष्यात तयार होऊ अशी प्रतिक्रिया यावेळी सचिन देवरे या विद्यार्थ्याने यावेळी व्यक्त केली"

-सचिन देवरे,

Tags:    

Similar News