शरद पवार यांचा राजकारणातून संन्यास?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करण्याबरोबरच शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे.;

Update: 2023-05-02 08:13 GMT

देशाच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तीमत्त्व म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी आज कुठल्याही राजकीय पदावर न राहण्याचा अर्थात एकप्रकारे राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, संसदेतील राज्यसभेच्या सदस्यत्वाचा ३ वर्षांचा कालावधी शिल्लक असल्यानं त्यामुळं या तीन वर्षात देशातील आणि राज्याच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेच्या सदस्यत्वा व्यतिरिक्त इतर कुठलीही जबाबदारी घेणार नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.


लोक माझे सांगाती या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राजकारणातील प्रदीर्घ कालावधीनंतर कुठतरी थांबण्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून (Nationalist Congress Party-NCP) निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. 

 लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमातच राष्ट्रवादीचे(NCP ) अध्यक्ष शरद पवार(Sharad pawar) यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत मोठी घोषणा केली. अध्यक्ष पदावरून राजीनामा देणार असून पक्षातील जेष्ठ मंडळी नव्या अध्यक्षाची नियुक्ती करतील असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर सभागृहातील कार्यकर्त्यांनी थेट व्यासपीठावर येत शरद पवार यांना विनवणी करण्यास सुरवात केली. शरद पवार यांच्या नावाच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले. गेले काही दिवस अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच शरद पवार यांनी केलेल्या या राजीनाम्याच्या घोषणेने राजकीय क्षेत्रात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.


Full View

Tags:    

Similar News