ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन, आदर्श लोकप्रतिनिधी हरपला

Update: 2021-07-31 03:36 GMT

 सांगोल्याचे जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. सोलापुरातील सहकारी रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन, आदर्श लोकप्रतिनिधी हरपलाकांही दिवसांपूर्वी त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. तब्बल 11 वेळा आमदार पद भूषवणाऱ्या गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने विविध स्तरातून दुःख व्यक्त होते आहे.

अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख यांना आदरांजली वाहिली आहे.

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Tags:    

Similar News