मुंबई महापालिकेत पराभवाच्या भीतीने शिवसेनेचा पळवाटा शोधन्याचा प्रयत्न: आशिष शेलारांचा आरोप
मुंबई महापालिके आगामी निवडणूकीच्या चर्चा सुरू झाल्या पासुन शिवसेनेची खलबतं आणि कट कारस्थान करत आहेत. पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचे काम शिवसेना करते आहे, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आज पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना करीत असलेल्या कटकारस्थानांचा पर्दाफाश केला. यावेळी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय, विश्वास पाठक आदी उपस्थित होते.
आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकी बाबत ज्या घडामोडी सुरु आहेत त्याबाबत आमचे बारीक लक्ष आहे. दीड वर्षापुर्वी कोरोनाची पहीली लाट आटोक्यात येतंय असं होताच त्यांचा पहीला डाव मुदत पुर्व निवडणुक घेण्याचा विचार झाला होता. पण दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट आली आणि यांचा डाव फसला.
दुसरा प्रयत्न असा केला की २०१७ मध्ये प्रभात रचना आहे ती असंविधानिक आहे असं चर्चा सुरू केली. भाजपाने आपल्या फायद्याची प्रभाग रचना केली असे अर्ध्या अभ्यासावर वातावरण निर्माण केले गेले. पण ती वाँर्ड रचना 2021 च्या जनगणनेच्या आधारावरच असल्याचे दिसून आले व हा प्रयत्न अभ्यास नसल्यामुंळे फेल ठरला. त्यासाठी मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या पगारावर घेण्यात आले होते.
पुन्हा तिसरा प्रयत्न आता सुरु आहे.
कोरोनाची तिसरी लाट येतेयं काळजी घेतली पाहीजे ही आमची सुद्धा भुमिका आहे. तिसऱ्या लाटेत मुळे अनेक अडचणी येतील असा अंंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. पण त्याचा फायदा घेत जनगणना करता येत नाही. नवी मतदार नोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदत वाढ देण्याचा प्रयत्न आता शिवसेनेचा सुरू आहे, असा आरोप आमदार अँड आशिष शेलार त्यांनी केला. ही भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीला मान्य आहे का त्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.
मुंबईतील 30 वॉर्ड आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, असं सांगीतले. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. भाजपा तयार आहे.असे त्यांनी सांगितले. तर पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, निवडणूका रणांगण असते आणि म्हणूनच जुन्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण करुन देतो असे सांगत ते म्हणाले की,
'बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है', अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाना साधला. दरम्यान, जर निवडणूक आयोगाला पुढे करुन दोन वर्षे निवडणूका पुढे ढकलत असाल तर त्या दोन वर्षातील सर्व कंत्राटे, ठेके यांच्या मंजूरीचे विषय स्थायी समितीकडे न जाता निवडणूक आयोगाकडे पाठवा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 20 हजार कोटींचा असून अशा अनेक प्रकल्पांना मंजूरी देणे बाकी आहे. त्यांच्या"कट" साठी ही कारस्थाने सुरु आहेत असा आरोप त्यांनी केला.
गाळ कुठे टाकला? फोटो दाखवा
यावेळी त्यांनी नालेसफाईच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेवर टीका केली. 70 कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. 5 लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे?, असा सवालही त्यांनी केला. ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा, असं आव्हान देतानाच नालेसफाईत सुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.