शब्द साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रजिया सुलताना यांची निवड

Update: 2024-08-30 13:12 GMT

शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन २०२५ सिंगापूर इथे आयोजित

शब्द साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्त्रीवादी लेखिका रजिया सुलताना यांची निवड करण्यात आल्याचं शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार यांनी जाहीर केलं आहे. सिंगापूर इथे नववे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन जानेवारीच्या महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. रजिया सुलताना यांची जवळपास ३४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यांच्या निवडीबद्दल साहित्य जगतातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यापूर्वी कवी आणि अभिनेते किशोर कदम, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक दगडू लोमटे आणि अनेक मान्यवरानी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले आहे.

रजिया सुलताना या कवियत्री ,लेखिका ,पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ता ,संघर्षमय जीवन जगलेल्या ,संवेदनशील तसेच निर्भिडपणे महिलांची बाजू सतत मांडत त्यांना व्यवस्थेविरुद्ध उभे राहून न्याय मिळवून देणाऱ्या म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी लैंगिक शिक्षणाचे कार्य अविरत करत निराधार ,गरीब,अत्याचार झालेल्या महिलांना न्याय मिळवून दिलाय. वेश्या व्यवसायातील लोकांचे प्रश्न आणि तृतीय पंथीय लोकांचं जगणं जगासमोर मांडून त्यांच्या समस्यांवर प्रचंड लिखाण केलं आहे.चाळीस वर्षे अनेक सामाजिक संघटना सोबत जुळून त्यांनी सामाजिक काम केलं आहे.

अमरावतीच्या रजिया यांना त्यांच्या लेखनाबद्दल आणि सामाजिक कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. ज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, श्रमसेवा पुरस्कार, विदर्भ रत्न पुरस्कार, महाराष्ट्र फाऊन्डेशन पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार, हमीद दलवाई पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भूषण पुरस्कार, (अमरावती एकता रॅलीतर्फे) जाजू पुरस्कार वर्धा, असे उल्लेखनीय पुरस्कार आहेत.

त्यांची एकूण साहित्यसंपदा बरीच मोठी आहे. महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, मासिकामध्ये त्यांनी स्तंभ लेखन केले आहे. त्यांचे ४ काव्यसंग्रह, १० कथासंग्रह, प्रवास वर्णन

अनुभवकथन प्रकाशित झाले आहेत.

रजिया सुलताना यांची प्रकाशित पुस्तके

पद्य

(१) प्रतिती (प्रेमकाव्य) दि. २९ जानेवारी १९९७

(२) चांदण्याचे गुपित (बालकाव्य) दि. १४ नोव्हेंबर १९९८

(३) इबादत (गलि संग्रह) ऑगस्ट २००९

(४) दो कदम आगे (दीर्घकाव्य) दि १४ ऑगस्ट २०१४

गद्य

(५) अपराजिता (कैदी महिलांचे आयुष्य) दि १० मे २००३

(६) नकाब (मुस्लिम महिलांच्या व्यथा) दि ३ जानेवारी २००४ (७) गणिकांच्या वेदना (देह व्यवसाय करणाऱ्या महिलांचे आयुष्य)

दि. ३ जानेवारी २००६

(८) बचतीचा नवा अर्थ (महिलांचे आर्थिक सबलीकरण) दि १ मे २००६

(९) जचकी (कथासंग्रह) दि. ३ जानेवारी २००९

(१०) मुस्लिमांचे भावविश्व (मुस्लिम जगत) दि. १४ फेब्रुवारी २०१०

लैंगिक अधिकार/महिला जगत व सामाजिक विषयांवरील पुस्तके

(११) सेक्स : एक सामाजिक प्रतिबिंब (प्रणय भावना) दि. १० मार्च २००७

(१२) अंथरुणातील बंडखोरी (विवाहबाह्य संबंधावर) दि. ४ एप्रिल २०१२

(१३) जनप्रवाहातील समलिंगी (गे विश्व) दि. १४ ऑगस्ट २०१२

(१४) हमजीन्सयता की नजाकत (लेस्बियन महिलांचे आयुष्य)

दि. ३ जानेवारी २०१३

(१५) कष्टकरी हातांना सलाम (कामगार विश्व) दि. ३ जानेवारी २०१५

(१६) रहस्य करनाटक्या महिलांचे (अंधश्रध्दा निर्मुलन)

दि. २० ऑगस्ट २०१५

(१७) राष्ट्रसंतांचे महिला विचार (महिलोन्नतीचे समीक्षण)

दि. ३० जानेवारी २०१७

(१८) जगणे हिजड्यांचे (हिजड्यांचे प्रश्न, समस्या वा उपाययोजना)

दि. २२ नोव्हें. २०१३ (१९) आपण मुलांचे पालक की मालक (बालकांच्या मानवाधिकाराबर)

दि. १४ नोव्हें २०१३ (२०) थायलंडची शब्द सफर (प्रवास वर्णन) दि. १२ जुलै २०१४

(२१) सौदी अरबची सफर (प्रवास वर्णन) दि १२ सप्टेबर २०१६

(२२) दुबई शब्द सफर (प्रवास वर्णन) दे. १४ नोन्हेंबर २०१७

Tags:    

Similar News