#SavitribaiPhule हॅश टॅग Twitter वर ट्रेन्ड...

सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त लाखो लोकाचं ट्विट, ट्विटर वर #SavitribaiPhule ट्रेन्ड... काय म्हटलंय नेटिझन्स नी पाहा...

Update: 2021-01-03 09:05 GMT

आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती. त्यानिमित्ताने देशभरातील लोकांनी ट्विटर वर #SavitribaiPhule असा हॅश टॅग वापरत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला आहे. #SavitribaiPhule या हॅश टॅगचा 18 हजार 900 लोकांनी वापर केला आहे. सध्या देशात दुसऱ्या क्रमांकावर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तर मराठी मध्ये "सावित्रीबाई फुले" या मराठी हॅश टॅग चा वापर करत 57 हजार 900 नेटिझन्स नी Tweets केलं आहे.

तर 'प्रथम महिला' या हॅश टॅगचा वापर करत 43 हजार 600 नेटकऱ्यांनी Tweets केलं आहे. एकंदरिंत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज ट्विटर वर लाखो लोकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यामुळं वेगवेगळ्या हॅशटॅग मध्ये आज दिवसभर सावित्री उत्सव ट्विटर ट्रेंड होत आहे. गेल्या वर्षी सावित्रीमाई प्रमाणे कपाळावर आडवी चिरी (आडवं कुंकू लावत) अनेक सामान्य महिलांसह अभिनेत्रींनी आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता...





Tags:    

Similar News