भाजपचे नेते बोलल्यानंतर NIA कडून माहिती बाहेर येते: जयंत पाटील

भाजपचे नेते बोलल्यानंतर NIA कडून माहिती बाहेर येते. जयंत पाटलांचा गंभीरआरोप;

Update: 2021-04-08 17:50 GMT

भाजपचे नेते बोलतात त्यानंतर NIA कडून काही माहिती बाहेर येते. याचा अर्थ तपास चालू आहे की, राजकारण चालू आहे. याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण होतेय असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. राज्यात सुरू असलेल्या सगळ्या घडामोडी व गोष्टीमागे सरकार कधी जाईल. याची वाट पाहणाऱ्या लोकांची शक्ती आहे का? अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपच्या नेत्यांनी दोन दिवस थांबा... अजून एक विकेट पडणार आहे. अशा आशयाचे भाष्य करणे आणि नंतर NIA मध्ये असलेलं पत्र प्रसारमाध्यमांना प्राप्त होणं आणि त्यात एक- दोन नाव समाविष्ट होणं हा काय प्रकार आहे असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

आता जे पत्र बाहेर आलं आहे. त्यावर मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. इतर नाव घेतली असेल तर त्यात तथ्य आहे की, नाही हे पत्र वाचल्यावरच कळतं. त्यामुळे यामागे भाजपचं राजकारण आहे. हे राज्य सरकारच्या लक्षात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.


Tags:    

Similar News