रॉबर्ट वाड्रा पॉझिटीव्ह, प्रियंका गांधी आइसोलेट


Robert Vadra tests Covid positive, Priyanka Gandhi goes into isolation;

Update: 2021-04-02 11:23 GMT

कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात स्वतः प्रियंका गांधी यांनी माहिती दिली आहे. प्रियंका गांधी यांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आहे. मात्र, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी स्वत:ला आइसोलेट केलं आहे.



प्रियंका गांधी यांनी या संदर्भात एक व्हिडीओ ट्वीटर वर शेयर केला आहे. यामध्ये त्यांनी आपण कोरोना संक्रमणाच्या संपर्कात आल्यानं आसाम. तामिळनाडू, केरळ चा दौरा रद्द करत असल्याचं म्हटलं आहे.


सध्या देशातील पाच राज्यांमध्ये निवडणूका होत आहेत. या पाच राज्यांच्या प्रचार दौऱ्यात प्रियंका गांधी चांगल्याच व्यस्त आहे. मात्र, कोरोनामुळं त्यांना आता हे दौरे रद्द करावे लागले आहेत.


Tags:    

Similar News