उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Update: 2021-09-12 10:46 GMT

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या एका मागून एक बलात्काराच्या घटना समोर येत आहे. अशातच उल्हानगर रेल्वे स्थानकावर एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे.

मुंबई पाठोपाठ उल्हासनगरमध्येही धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. उल्हासनगर स्थानकास लागून असलेल्या स्कायवॉकवर 14 वर्षाची मुलगी उभी असताना एक तरुण तिच्या जवळ आला. मुलीला एका निजर्नस्थळी घेऊन गेला. त्या ठिकाणी मुलीला बेदम मारहाण केली, नंतर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर मुलीला सोडून आरोपी पसार झाला.

Tags:    

Similar News