पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रांगोली व दीप मानवंदना
वयाची 80 वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम करणाऱ्या पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळातर्फे पुण्यात रांगोली व दीप मानवंदना देण्यात आली.;
वयाची 80 वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम करणाऱ्या पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यात रांगोली व दीप मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळातर्फे ही मानवंदना देण्यात आली आहे.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आतापर्यंत तब्बल 5 लाख किमी प्रवास करत शिवचरित्र प्रसाराचे काम केला आहे, आतापर्यंत त्यांच्या राजाशिवछत्रपती ग्रंथाच्या 17 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत, जगभरात 25 हजार व्याख्याने त्यांनी दिली आहेत, तर 3 कोटी रुपयांचा दानधर्म आणि आशियातील दुस-या क्रमांकाचे महानाटय जाणता राजा चे 1200 प्रयोग व 1 कोटी प्रेक्षक असा थक्क करणारा प्रवास करीत वयाच्या शतकपूर्तीकडे ते वाटचाल करत आहेत. या पार्श्वभुमीवर पुण्याच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळातर्फे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भव्य रांगोळी साकारत व 99 दीप प्रज्वलित करुन मानवंदना देण्यात आली.