ऑक्सिजनच्या कमतरेमुळे रुग्णांचं मॉकड्रील, 22 रुग्णांचा मृत्यू, प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा
UP मध्ये ऑक्सिजनच्या कमतरेमुळे रुग्णांचं मॉकड्रील, 22 रुग्णांचा मृत्यू, प्रियंका गांधींचा योगी आदित्यनाथ सह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा, काय आहे प्रकरण?;
कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 1.3 मिनिटाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओ मध्ये ऑक्सिजन संपल्यानंतर रुग्णांचा ऑक्सिजन काढून त्याची मॉकड्रील करण्यात आल्याचं हॉस्पिटलमधील स्टाफ चर्चा करताना सांगत आहेत. या मॉकड्रील मध्ये 22 लोकांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगत आहेत. ऑक्सिजन संपल्यानंतर आपण स्टाफला रुग्णांना घरी सोडून देण्याचे आदेश दिले होते. एवढंच नाही तर सदर डॉक्टर मुख्यमंत्री देखील ऑक्सिजन देऊ शकणार नाही. असं सांगत आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनची कमतरता असताना योगी आदित्यनाथ यांनी ऑक्सिजनची कमतरता नसून लोक अफवा पसरवत असल्याचं म्हटलं होतं. तसंच जे लोक ऑक्सिजनची कमतरता आहे. असं सांगतात. अशा लोकांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश योदी आदित्यनाथ यांनी दिले होते.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून ला माध्यमांशी संवाद साधताना 'मी ऑक्सिजन कमी पडू दिला नाही' असं म्हटलं आहे. यावरुनच प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात... पंतप्रधान: मी ऑक्सिजन कमी पडू दिला नाही
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ: "ऑक्सीजनची कुठलीही कमतरता नाही. ऑक्सिजन कमी असल्याची अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार" मंत्री: "रुग्णांना गरज असेल तरच ऑक्सिजन द्या, जास्त ऑक्सिजन देऊ नये. आग्रा हॉस्पिटल: "ऑक्सिजन संपला होता. 22 रुग्णांचा ऑक्सिजन बंद करुन मॉकड्रील करण्यात आली"
दोषी कौण? असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.