स्मार्ट सिटी मिशनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेला 4 स्टार रेटींग, राज्यभरातून कौतूकाचा वर्षाव

भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत हवामानाबद्दल केलेल्या कामाची दखल घेत चार रेटींगने पिंपरी चिंचवड महापालिकेचा गौरव करण्यात आला.;

Update: 2022-04-20 04:13 GMT

भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या क्लायमॅट स्मार्ट सिटीज स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने चार रेटींग मिळवले आहेत. त्यामुळे राज्यभरातून पिंपरी चिंचवड महापालिकेवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत देशभरातील महापालिकांचे मुल्यांकण करण्यात आले होते. त्यामध्ये हवेची शुध्दता यासह पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गुणांकण करण्यात आले होते. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने चांगल्या पध्दतीने काम केल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेला चार रेटींग मिळाल्याची माहिती आयुक्त राजेश पाटिल यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेला क्लायमेट स्मार्ट सिटीजमध्ये चार रेटींग मिळाल्या आहेत. मात्र त्याबरोबरच आयोजित करण्यात आलेल्या ओपन डेटा सप्ताह 2022 मध्येही पिंपरी चिंचवड महापालिकेने चांगले काम केल्याने महापालिकेचा गौरव करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत देशभरातील महापालिकांच्या कामाचे मुल्यांकण करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा गौरव करण्यात आला. मात्र क्लायमॅट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क 2.0 मध्ये नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन केले. त्याबद्दल शहरातील नागरिक, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आभार मानले.

Tags:    

Similar News