#PetrolDieselPriceHike : १ लिटर पेट्रोल परवडत नाही आणि थोडे पेट्रोल पंपचालक देत नाहीत
पाच राज्यांच्या निवडणुका संपताच मार्च महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात प्रचंड वाढ झाली आहे. देशांतर्गत इंधन दर जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी संलग्न आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून दररोज किरकोळ इंधन दरवाढ केल जात आहे. पेट्रोल आणि डीझेल भाव गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे नागपुरमध्ये पेट्रोल पंपचालकाने 50 रुपयांच्या खाली पेट्रोल भेटणार नाही, असे बोर्डच लावले आहेत.