पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्या नात्याला कोणाची दृष्ट...?

Update: 2020-10-25 10:34 GMT

आज दसरा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी प्रमाणे दसरा मेळावा पार पडला. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन पार पडला. सावरगावच्या भगवान भक्तीगडावर पार पडलेल्या ऑनलाईन सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांचे नाव घेताना माजी मंत्री महादेव जानकर यांचे देखील नाव घेतले. मात्र, हे नाव घेताना... आता या जोडीला दृष्ट लागू नये... अशी चिंता व्यक्त केली. काय म्हटलं पंकजा मुंडे यांनी..

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले महादेव जानकर त्यांच्याशिवाय माझा कुठलाही कार्यक्रम कधीही पूर्ण होत नाही. माझे बंधू महादेव जानकर... आता या जोडीला दृष्ट लागू नये... बाबा... फार दृष्ट लागते बाबा... असं म्हणत पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर आणि त्यांच्या नात्याला दृष्ट लागू नये अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र, पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्या नात्याला कोणाची दृष्ट लागणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये राजकीय वाद असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकला.

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे पक्षातील संबंध चांगले होते. मात्र, खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया तर नाही ना? कारण खडसेंबरोबरच सध्या महादेव जानकर देखील भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं जानकर देखील भाजप सोबत असलेली युती तोडतील का? जानकर आणि पंकजा मुंडे यांच्या नात्याला कोणाची दृष्ट लागणार? आता या चर्चेला राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे.

Tags:    

Similar News