जुन्या वाड्याची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जण अडकल्याची भीती

पुण्यातील फुगेवाडी येथे जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर, दोघेजण ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.;

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-08-28 08:27 GMT
जुन्या वाड्याची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जण अडकल्याची भीती
  • whatsapp icon

पुणे : पुण्यातील फुगेवाडी येथे जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर, दोघेजण ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामकदलाच्या पथकाने घटनास्थळ गाठत मदतकार्य सुरू केले आहे. ज्या भागात ही घटना घडली त्या सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईनचे खोदकाम सुरू होते. त्यासाठी भिंतीच्या बाजूला खड्डा खोदल्या गेला होता.

त्यामुळेच भिंती खालील माती खचली गेल्याने भिंतीजवळ उभ्या असलेल्या राजेश नामक व्यक्तीच्या अंगावर भिंत कोसळली. या दुर्घटनेत राजेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अग्निशमन दलाच्या बचावकार्यात एक मुलगी मात्र सुखरूप बचावली आहे. आशु मळके असं या मुलीचं नाव असून तिला वायसीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात असले आहे. दरम्यान अजूनही दोघेजण या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांचा शोध अग्निशमन विभागाचे कर्मचारी घेत आहेत.

Tags:    

Similar News