OBC आरक्षण : विविध संघटनांचा रास्ता रोको

Update: 2021-06-18 08:11 GMT

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निर्णय दिला आहे. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केलेले आहे. पण रद्द केलेले राजकीय आरक्षण पुर्ववत करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या आणि इतरही मागण्यांसाठी आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी अखिल भारतीय समता परिषद तसेच इतरही सामाजिक संघटनानी अहमदनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले. अहमदनगरच्या इम्पिरीयल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आहे.

Full View

Tags:    

Similar News