New parliament : विरोधकांचा बहिष्कार मात्र पंतप्रधान मोदी यांच्याकडून नव्या संसद भवनचे उद्घाटन

नव्या संसद भवनचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न करण्यात आल्याने 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. मात्र त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.;

Update: 2023-05-28 05:41 GMT

नव्या संसद भवनचे उ्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते न करण्यात आल्याने वादात सापडले आहे. त्यामुळे देशातील 19 विरोधी पक्षांनी या नव्या संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. मात्र त्यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांना सेंगोल सुपूर्द केल्यानंतर सर्वधर्म सभा घेण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या सभेला बौध्द, जैन, पारसी, शीख, मुस्लिम धर्माचे धर्मगुरुंनी पार्थना केली.

यानंतर दुपारी नव्या संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमातून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे देशाला संबोधित करणार आहेत.

75 रुपयांचे नाणे आणि स्टँप होणार जारी

नव्या संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमातून 75 रुपयांचे नाणे आणि स्टँप जारी करण्यात येणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत.

विरोधकांचा बहिष्कार का?

नव्या संसद भवनच्या उद्घाटनावर 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. त्यामुळे नव्या संसद भवनचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनचे उद्घाटन केले आहे.

उपराष्ट्रपतीही कार्यक्रमाला अनुपस्थित-

उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष असतात. त्यामुळे नव्या संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासमवेत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची उपस्थिती असणे आवश्यक होते. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रपतींसमवेत उपराष्ट्रपतीही अनुपस्थित असल्याचे दिसून आले.

Tags:    

Similar News