बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी विधानसभेत उपस्थित करत आपल्याच पक्षाची कोंडी केली. तर जिल्ह्यातील नमिता मुंदडा, संदीप क्षीरसागर या आमदारांनीही जिल्ह्यात पोलिसांचा वचक राहिलेला नाही, माफीयाराज वाढल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. तर नाना पटोले यांनीही संधी साधत पोलीस आणि महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्र्यांनी कठोर पावलं उचलण्याचे आवाहन केले.