भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार जबाब देणार

Update: 2021-07-10 03:39 GMT

महाराष्ट्रात सामाजिक उलथापालथ करणाऱ्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांचा जबाब नोंदवला जाणार आहे.भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज २ ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आला होता. शरद पवार यांनी या संबंधात वक्तव्य केली आहेत.

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांनी एकूण १६२ जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळं भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काही लोक अद्यापही तुरुंगात आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शरद पवार यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं केली होती. त्यानंतर हा आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगानं १८ मार्च २०२० रोजी शरद पवारांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावलं होतं. मात्र, करोना लॉकडाऊनमुळं नंतर आयोगाचं कामकाज ठप्प झालं होतं. ते आता पुन्हा सुरू होणार आहे.

शरद पवार यांनी पुण्यातील शनिवार वाडा प्रांगणात आयोजित केलेल्या एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.तसेच त्यांनी भीमा कोरेगावबद्दल काही माहिती दिली होती.त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाने मान्य केली होती.

Tags:    

Similar News