नवाब मलिकांना ईडीचा दणका, आठ मालमत्तांवर जप्ती

Update: 2022-04-13 10:20 GMT

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि ( Ncp)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांना ईडीने आणखी एक धक्का दिला आहे.ईडीने (ED) नवाब मलिकांची मालमत्ता जप्त केली आहे.मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर जप्ती आणली आहे.

कुर्ला पश्चिमेमधील व्यावसायिक जागा आणि उस्मनाबादमधील १४८ एकर जमीनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.आजच सर्वोच्च न्यायालयाने म नवाब मलिक (Nawab malik)यांच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेत नवाब मलिक यांनी न्यायालयाकडे तत्काळ सुटकेची मागणी केलेली आहे.

नबाव मलिक यांना ईडीने पुन्हा दणका दिला आहे. आधी जमीन खरेदी प्रकरणात ईडीने अटक केली होती. आता नवाब मलिक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी कारवाई करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आजच त्यांचे वकील कपिल सिब्बललवकरात लवकर सुनावणीची मागणी केली होती.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बेनामी मालमत्ता विकत घेतल्याच्या आरोपात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. दरम्यान, विशेष पीएमएलए कोर्टानं आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती.

Tags:    

Similar News