Mumbai: मालवणी भागात इमारत कोसळली, 11 लोकांचा मृत्यू

Update: 2021-06-10 05:25 GMT

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

मुंबईत गेल्या 24 तासापासून फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून त्याचे परिणाम दिसायला सुरवात झाली आहे. पावसाच्या अतिवृष्टीमुळे मालाड पश्चिम येथील मालवणी भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या 1 मजली चाळीवर कोसळला.

खबरदारीची बाब म्हणून इमारतीतील इतर मजल्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. काल रात्री मालवणी गेट क्र. ८, मालाड (पश्चिम) येथे इमारत कोसळल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत. ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या १ मजली चाळीवर कोसळले. या घटनेत १७ व्यक्ती जखमी झाले असून ११ व्यक्तींचे दुर्दैवी निधन झाले आहे.

Tags:    

Similar News