Mumbai Murder case : मुंबईतील एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या
छत्तीसगड येथील 25 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेसची मुंबईतील पवई येथे गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणातील आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
छत्तीसगड येथून मुंबईत आलेल्या 25 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेसची पवई येथे हत्या झाली होती. त्या प्रकरणी 40 वर्षीय विक्रम अटवाल नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र या आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रुपल ओगरे ही एप्रिल महिन्यात एअर इंडियामध्ये नोकरीसाठी मुंबईत आली होती. रुपल तिची बहिण आणि तिच्या बहिणीचा बॉयफ्रेंड यांच्यासोबत राहत होती. मात्र बहिण आणि तिचा बॉयफ्रेंड शहराच्या बाहेर गेले असताना साफ-सफाईचे काम करणाऱ्या विक्रम अटवालने चाकूचा धाक दाखवून रुपलसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये झटपट झाली आणि त्याने चाकूने रुपलचा गळा कापला. त्यानंतर दरवाजाचे ऑटो लॉक लावून निघून गेला. त्यानंतर रुपलच्या कुटूंबियांनी स्थानिक मित्राला तिच्या रुमवर पाठवले. त्यावेळी तिच्या रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी संबंधित व्यक्तीने पोलिसांना कळवले. त्यानतंर दरवाजा उघडला तर रुपलचा गळा कापलेला पहायला मिळाला. त्यानंतर पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली. मात्र विक्रम अटवालने अंधेरी पोलिस ठाण्यात पँटने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.