ऑनलाईन ओपीडी, डॉक्टरांचा सल्ला आता थेट मोबाईलवर

Update: 2020-06-10 02:44 GMT

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला,आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. यासेवेसाठी मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून आठवडाभरात ते सुरू होणार आहे. या एपचा अधिकाधिक रुग्णांना लाभ घेता येऊ शकेल.

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या वेबसाइटली रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.

हे ही वाचा..

#कोरोनाशी लढा- लालपरीची साथ, लाखो मजुरांना मदतीचा हात

WhatsApp ग्रुप एडमिन्सना सायबर विभागाचा इशारा

काय आहे सुरक्षा कवच अँड्रॉइड ऍप (Suraksha Kavach) Application ?

या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत कॉम्प्युटर, लॅपटॉपचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला घेऊ शकतो. यासेवेचे मोबाईल ॲप तयार झाल्यावर त्याचा सामान्यांकडून वापर अधिक प्रमाणात वाढेल. त्यावेळेस आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढवली जाईल असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या या संयुक्त उपक्रमात ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध असून त्यासाठी रुग्णाकडून फी आकारले जात नाही. रविवारी ही सेवा उपलब्ध नसते.

राज्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महानगरांमधून या ऑनलाईन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ई-संजीवनी ओपीडीची सेवेचा वापर कसा कराल?

१) नोंदणी करून टोकन घेणे- मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.

२) लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.

३) वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टीवेट) होते. त्यानंतर व्हीडओ कॉलद्वारे डॉकटरांशी चर्चा केली जाते.

४) चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.

Similar News