Covid vaccinations: महाराष्ट्र कोट्याधीश

Covid vaccinations: महाराष्ट्र कोट्याधीश Maharashtra crosses one crore Covid vaccinations;

Update: 2021-04-12 05:34 GMT


राज्यात दिवसाला ६५ हजारांपेक्षा कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला. तरीही देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली आहे. आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

Tags:    

Similar News