संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत मराठा बांधवांचा आक्रोश मोर्चा
नांदेड :संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत मराठा बांधवांचा आक्रोश मोर्चा, आरोपींची नार्को टेस्ट करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आरोपींची नार्को टेस्ट करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा. तसेच या घटनेतील आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा मराठा समाज सनदशीर मार्गाने न जाता कायदा हातात घेवून रस्त्यावर उतरेल असा इशारा देत मराठा बांधवांकडून अर्धापूर येथे आक्रोश मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले.